वरोरा तालुक्यात भाजपातर्फे कोरोना योद्ध्यांचा राखी बांधून तसेच सन्मानपत्र देऊन सौ .रोहिणीताई देवतळे यांचे नेतृत्वात सत्कार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Aug 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- जगा सह भारत देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता शिपाई, कृषी अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका बँक अधिकारी, तसेच अनेक अधिकारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी योध्ये म्हणून कार्यरत आहे. त्या मुळे 
आज वरोरा तालुक्यातील एहतेश्याम अली(नगराध्यक्ष न.प वरोरा) संजयजी बोधेले(BDO वरोरा) संजयजी वानखेडेे(सहाय्यक गटविकास अधिकारी वरोरा)धात्रक साहेब(कृषी अधीकारी)ठाकरे साहे(कृषी अधिकारी)खांडरे साहेब(कृषी अधिकारी)मुंगल साहेब(जेष्ठ सहाय्यक)चनफने साहेब(पंचायत विस्तार अधिकारी)मंडकवार साहेब(विस्तार अधिकारी)बर्वे  साहेब(विस्तार अधिकारी)डाँ.मुंजनवार साहेब(आरोग्य अधिकारी)व त्यांचे सर्व सहकारी,सचिन गोसावी(तहसिलदार साहेब वरोरा) यांचा सत्कार सौ. रोहिणीताई देवतळे (माजी सभापती प.स.वरोरा) यांचे नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे सह सौ.वंदनाताई दाते(पंचायत समिती सदस्य), सौ.ज्योतिताई वाकडे(जिल्हा  परिषद सदस्या),सौ.संगिताताई निबांळकर(भाजपा तालुका अध्यक्ष वरोरा) यांचे हस्ते कोरोना योद्दाचा सत्कार समारंभ घेण्यात आला.