Top News

राम जन्मभूमी शिलान्यास कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टीचा ब्रम्हपुरीत उत्सव.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- मागील ५०० वर्षांपासून प्रलंबित असलेला राम जन्मभूमीचा विषय मार्गी लागला. आज ५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा शिलान्यास सोहळा आज अयोध्येत पार पडला.

याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तर्फे ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी येथे हा सोहळा हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. ब्रम्हपुरी येथील सावरकर चौक येथे हनुमान मंदिर येथे व प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पूजा, अर्चना, आरती करण्यात आली. व ५००० नागरिकांना लाडूचा प्रसादाचे वितरण करण्यात आले. व ब्रम्हपुरी शहरातील प्रमुख देवस्थानात लाडूचा प्रसाद पाठविण्यात आला.

या प्रसंगी अनेक नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने