अयोध्येत प्रभु श्रीराम मंदीर निर्माण शुभ प्रसंगी चंद्रपूरात कारसेवकांचा सत्कार.

प्रभु श्रीराम मंदीर निर्माण समस्त देशवासीयांच्या आस्थेचा आदरपूर्वक विजय:- ॲड. रविंद्रजी भागवत.
Bhairav Diwase.    Aug 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- राम जन्मभुमी निर्माण कार्य हा एक आनंदाचा क्षण आहे. सतत 492 वर्ष मंदीरासाठी संघर्ष सुरू होता यासाठी अनेकांनी आंदोलन केले. अनेक कारसेवक तुरूंबगात गेले अनेकांनी बलीदान केले. त्यांची स्मृती जागवणारा हा सवर्ण क्षण आहे. दोन कारसेवा मुळे न्यायालयाला सुध्दा लवकर सुनावनी करावी लागली आणि सत्याचा विजय झाला. मंदीर निर्माणासाठी जनमानसाचा रेटा होता. नियोजित पध्दतीने व शिस्तीने आंदोलन झाले याचा हा परिणाम आहे असे चंद्रपूर नगर संघचालक श्री रविंद्रजी भागवत यांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या कार्यालयात आयोजित कारसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या कार्यालयात राम जन्मभुमी अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मंदीर निर्माण कार्याच्या शुभारंभ होत असतांना कारसेवकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसंघचालक ॲड. रविंद्र भागवत यांच्या हस्ते व श्री रमेशचंद्रजी बागजा, श्री विजयभाऊ पद्लमवार, श्री दामोधर मंत्री, श्री मधुसुदन रूंगठा यांच्या विशेष उपस्थितीत 24 पुरूष व 11 महिला कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री अहीर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभु श्रीराम मंदीर निर्माणाचा शुभारंभ होत आहे याची आठवण म्हणुन कारसेकांचा सत्कार केला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी असला तरी जनमानसांचा असलेला रेटा आणि दोन कारसेवा यांचे हे फलीत आहे. हा क्षण करोडो हिंदुंचा सन्मान आणि सुवर्ण क्षण म्हणुन साजरा होत आहे असे भाषनात सांगीतले.
कारसेवकांच्या या सत्कार समारंभाला सत्कारमुर्ती ॲड. सुनील देशकर, दिवाकर थोटे, किशोर डेहनकर, मुकुंद पाठक, पराग दवंडे, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, राजेंद्र कागदेलवार, विजय यंगलवार, डाॅ. पंत, ॲड. पाचपोर यांच्यासह अन्य कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री खुशाल बोंडे, दिवाकर थोटे, राजेंद्र गांधी यांनी कारसेवेतील आपले अनुभव कथन केले. सदर कार्यक्रम प्रशासकीय नियमाचे पालन करून व सामाजिक अंतर राखुन पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने