Bhairav Diwase. Aug 05, 2020
कोरपना:- राम जन्मभूमी पूजन माननीय नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री यांच्या हस्ते संपन्न या निमित्त आज कोरपना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येथे भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पूजा-अर्चना करून श्रीराम भक्तांनी कोरपना येथील बस स्टॉप चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून जय श्रीराम च्या घोषणा देत मोठ्या हर्षोल्हासात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला श्री नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री विशालजी गज्जलवार,श्री गंगाधर कुंटावार,श्री ओम पवार,श्री मेघराज हरबडे,श्री पद्माकर धगडी,श्री मनोज गोरे (वार्ताहर),श्री बुरकर जी,श्री प्रवीण भोयर,सुधाकर कवलवार आधी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.