प्रत्येक गावात लसीकरण शिबिरे राबवून लंप्पीचे उच्चाटन करण्यासाठी झटा:- अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले.

Bhairav Diwase
पं. स. स्तरावरील रखडलेली कामे शीघ्रतेने मार्गी लावण्याचे दिले निर्देश.

लम्‍पीच्या पार्श्‍वभूमीवर पोंभुर्णा पं. स. ता आढावा बैठक.
Bhairav Diwase. Aug 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्रामीण भागात जनावरांमध्ये त्वचेच्या लम्‍पी स्किन डीसीस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर नियंत्रण मिळवून समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणी जनावरांवर औषधोपचार आणि लसीकरण शिबीरे घेण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज पोंभुर्णा पंचायत समिती येथे भेट देऊन तालुक्यातील लम्पी रोगाला आटोक्यात आणण्यासाठी तालुकास्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जि. प. प्रशासन पशुपालकांना सर्वतोपरी सहकार्य करेल. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. बी.डी.ओ, पशुधन विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी सतत नागरिकांच्या संपर्कात राहून जनावरांची माहिती घ्यावी, प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन करावे. कुठे लसींच्या पुरवठा कमी झाला किंवा मनुष्यबळाची आवश्यकता भासली तर, तश्या सूचना आपल्या वरिष्ठांना व स्थानिक लोकप्रतिनिधींना करा आणि लम्पीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी झटा. अशी सूचना त्यांनी केली. यासोबतचं जिल्ह्यात कोरोणा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्यावतीने काय खबरदारी पाळण्यात येत आहे या संदर्भातही त्यांनी माहिती घेतली. तसेच पंचायत समितीस्तरावरून बांधकाम विभागाच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या कामाची स्थिती, नवीन प्रस्तावित अंगणवाड्यांचे बांधकामे व निर्लेखन, शौचालयांच्या दुरुस्त्या व बांधकाम, शोषखड्डे, ग्रामपंचायत भवन यांच्या बांधकामाविषयी माहिती घेत १४ व्या वित्त आयोगअंतर्गत सुरू असलेल्या कामांची त्यांनी संपूर्ण माहिती मागत रखडलेली कामे जलदगतीने पूर्णत्वास न्या. आणि १५ व्या वित्त आयोगाचे कामे शासन निकषानुसार पूर्ण करा अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या. तसेच सिंचाई आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या आणि रखडलेल्या कामाच्या स्थितीची माहिती घेत त्यांनी अनेक सूचना केल्या. तसेच महिला बालकल्याण विभागाच्यावतीने सुरू असलेल्या कार्याचा आढावाही घेतला.
ज्यामध्ये अंगणवाडीबाबत माहिती, स्याम-म्याम संदर्भात माहिती, अमृत आहार योजनेची माहिती त्यांनी यावेळी मागितली. आणि नरेगाच्या माध्यमातुन सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच लघुसिंचनांतर्गत करण्यात येत असलेले मामा तलाव दुरुस्त्या, नवीन बांधकामे, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना व रमाई आवास योजनेंतर्गत असलेले बांधकामे इ. विषयी माहिती त्यांनी यावेळी आढाव्यात घेतली.
यावेळी त्यांसमवेत, जि. प. सदस्य राहुलभाऊ संतोषवार, पं. स. सभापती कु. अल्काताई आत्राम, उपसभापती ज्योतीताई बुरांडे, पं. स. सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, संवर्ग विकास अधिकारी निकेश भोयर, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्जेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. दामले, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. काळे, पशुधन पर्यवेक्षक, डॉ. लाडे, डॉ. चव्हाण यांसह आदि मंडळी उपस्थित होते.