Bhairav Diwase. Aug 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल येथील चामोर्शी रोड वर जनित्राला असलेल्या विद्युत उपविभाग विज केंद्राला अचानक शॉर्ट सर्किट मुळे आज दुपारी 2 वाजताचे सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
ह्या आजचे स्वरूप बघून भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र काही वेळातच आग आपोआप आटोक्यात आली.
हें जनित्र जळाल्यामुळे बेंबाळ येथिल 33 के. वी. विज केंद्रावर याचा परिणाम झाला. त्यामुळे बेंबाळ आणि त्या परिसरातील नवेगाव, जुनासुर्ला, नांदगाव, चांदापूर आदी गावातील विज पुरवठा खंडित झालेला आहे.
यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही..