Bhairav Diwase. Aug 03, 2020
ब्रम्हपुरी:- भाजपचे महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री, मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात "सेवा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. दरवर्षी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येते. परंतु यंदा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत एक अनोखा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आला. भा.ज.यु.मो चे जिल्हा अध्यक्ष ब्रिजभूषणजी पाझारे यांच्या संकल्पेतून 30 जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यात जन्मलेल्या शिशुंना "शिशु बेबी किट" चे वितरण करण्याचे ठरविले.
ब्रम्हपुरी मध्ये सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाने ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.सुयोगजी बाळबुधे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम ब्रम्हपुरी येथे राबविला. दिनांक 30 जुलै ब्रम्हपुरी येथे एकूण 16 शिशु जन्मले. या सर्वांना भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने आज "शिशु बेबी किट" चे वितरण करण्यात आले.
या किट वाटपा प्रसंगी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवें, तनय देशकर, रजत थोटे, शहर सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, नगरसेवक सागर आमले, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष पंकज माकोडे, अमित रोकडे, भारत सावकार, अमित कन्नाके यांच्या सह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.