कोरोना योध्ये पोलिसांना बांधल्या भाजप महिला कार्यकरर्त्यांनी राख्या.

Bhairav Diwase
सौ वर्षा शेंडे यांनी बांधल्या पोलीस बांधवांना राख्या.
Bhairav Diwase.    Aug 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- जगा सह देशात कोरोना महामारी सुरू असताना पोलीस बांधव व आरोग्य अधिकारी कर्मचारी हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी योध्ये म्हणून कार्यरत आहे रक्षाबंधन च्या दिवशी सुद्धा कर्तव्यावर असताना त्यांना बहिनेचे अतूट नाते कायम राहावे यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महिला आघाडीच्या सौ वर्षा अनिल शेंडे यांनी पोलीस चौकी शंकरपूर येथिल विनोद जांभळे सहाय्यक पोलीस निरीक्षक  व कर्मचारी यांना राखी बांधून बहीण भाऊ चे नाते अतूट ठेवून कायम ठेवीत रक्षाबंधन चा कार्यक्रम केला यावेळी   सुधाकर लोहकरे, रंगनाथ खोब्रागडे अमित उरकुडे परमेश्वर नागरगोजे यांना सुद्धा राख्या बांधल्या   

    दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र  शंकरपूर येथील डॉ मडावी 
व  आरोग्यसेवक बालाजी महले विकास जनबंधु रामटेके सिस्टर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून बहीण भाऊ चे नाते अतूट ठेवले.