ब्रम्हपुरी येथील आज सकाळची घटना.
Bhairav Diwase. Aug 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी वरून मिनी ट्रक क्र. MH 29 T 939 अर्हेर नवरगाव येथील माँ तुळजाभवानी राईस मिल मध्ये तांदूळ सालटेक्स करण्यासाठी येत असताना भालेश्वर येथील 2 युवक कुर्झा येथील शेतावर येत असताना ट्रक ला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला तर एक किरकोळ जखमी झाला असून उपचारास नेत असतांना दुचाकी चालकाचा मृत्य झाला.
सविस्तर भालेश्वर येथील सौरभ लालाजी पिलारे (२२) हा युवक आपल्या मोटर सायकल क्र*MH34BJ1376 ने भालेश्वर येथून कुर्झा येथील शेता कडे येत होते तर ब्रम्हपुरी वरून मिनी ट्रक MH 29 T 936 हा अरेर नवरगाव येथे माँ तुळजाभवानी राईस मिल मध्ये तांदूळ सालटेक्स करण्यासाठी येत असताना गावा लगतच्या नहरा जवळ मोटर सायकल क्र MH 34 BJ 1376 ही भरधाव वेगात येत असता मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल ही मिनी ट्रक वर धडकल्याने सौरभ लाला पिलारे 22 भालेश्वर व रणजित उमेश बुल्ले 22 भालेश्वर हे जखमी झाले.
सौरभ लाला पिलारे 22 हा गंभीर असल्याने अर्हेर नवरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेने ब्रम्हपुरी येथे नेत असतांना वाटेतच निधन झाले ही घटना आज सकाळी 7 वाजता च्या दरम्यान घडली असून सदर घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत