सावली येथील सिंचन उपविभागीय कार्यालय गोंडपिपरीला स्थलांतरित होणार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Aug 03, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- शंभर वर्षापूर्वी इंग्रज कालीन अस्तित्वात असलेले शेतकऱ्यांच्या हितासंबधी सावली येथील सिंचन उपविभागीय कार्यालय स्थलांतरित करुन गोंडपिपरी येथे हलविण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. सध्या शेतीचे हंगाम सुरु असतांना सिंचन कार्यालय स्थलांतरित केल्यास शेतीसाठी पाणी वितरण कसे होणार , हा प्रश्न सावली तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे. यात नावारुपास आणि अंत्यत सामान्य जनतेच्या समस्येसाठी झटणारे मा. पालकमंत्री यांची मौन धारणा अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
              आसोलामेंढा तलावात पाण्याचा मुबलक साठा असतांना पाणी डोक्याला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सावली तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी आसोलामेंढा तलावाला राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार बऱ्याच वर्षांपासून नहराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून, बऱ्याच ठिकाणी अनेक कामे अर्धवट असल्याने शेतीकरिता पाणी वाटपात अडथळे निर्माण होत आहेत.आणि सिंचन विभागाचे सावली येथील सिंचन उपविभागीय कार्यालय इतरत्र स्थलांतरित करण्यापेक्षा सावली तालुक्यातील आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्रमांक २ येथे जोडावे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक कार्यालयात आसोलामेंढा नुतनीकरण प्रकल्प विभाग क्रमांक २ येथे जोडण्याचा निर्णय झाला होता. तोच निर्णय कायमस्वरूपी ठेवावा. सिंचन विभागात मनुष्यबळ कमी असले तरी आसोलामेंढा नहर निरिक्षकाकडून शेतकऱ्यांना शेतीकरिता पाणी वाटप करण्याचे अधिकार आहेत .त्यामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंळांतर्गत येणाऱ्या जलसंपदा विभाग व गोसेखुर्द प्रकल्प विभाग नागपूर यांनी विभागीय समन्वय साधून सावली येथील सिंचन उपविभागीय कार्यालय कायम ठेवावे . यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची प्रतिक्रिया काय असणार आहे. हे सुद्धा येथील शेतकरी बांधव आशेने बघत आहेत .अन्यथा सावली तालुक्यातील शेतकरी वर्ग आंदोलन करु शकतात ही सुध्दा बाब नाकारु शकत नाही.