महाराष्ट्र शासनाने मंदिर उघडावी यासाठी "दार उघड, दार उघड, उद्धवा दार उघड" अशा घोषणा देत मंदिर उघडण्याची मागणी केली.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
पोंभुर्णा:- महाराष्ट्र सरकारने सर्व धर्मियांचे देवालये तसेच प्रार्थना स्थळे त्वरित उघडावी या मागणीसाठी आज केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य श्री. राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत मौजा गंगापूर नवीन(बुथ बोर्डा दीक्षित) येथे "दार उघड, दार उघड, उद्धवा दार उघड" अशा घोषणा देत मंदिर उघडण्याची मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली त्यात गावातील समस्त भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते.