Bhairav Diwase. Aug 29, 2020
कोरपना:- कोरपना तालुका भाजप च्या वतीने आज दि २९ ऑगस्ट ला घंटानाद आंदोलन तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे,
राज्य सरकारने दारू दुकाने चालू करण्यास परवानगी दिली परंतू धार्मिक स्थळे उघळण्याची अजूनही परवानगी दिली नसल्याने जनतेच्या मनात उद्रेक आहे, अशा परिस्थिती जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता धार्मिक स्थळे उघळण्याची तत्काळ परवानगी देण्यात यावी या बाबत प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार कोरपना येथे आंदोलन करण्यात आले आहे, यावेळी नगरसेवक अमोल आसेकर, किशोर बावणे, पुरुषत्तम भोंगळे, शशिकांत आडकीने, पवन मोहितकर, पद्माकर दगडी,पुंडलिक उलमाले,संजय टोंगे, अनिल कौरासे, अभय डोहे, यशवंत इंगळे, दिनेश खडसे, जगदिश पिंपळकर,जय पवार आदीची भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.