Top News

सद्या शाळा बंद पण या होतकरु युवकांच्या माध्यमातून माञ शिक्षण चालू.

गोंडपिपरी तालुक्यातील बहुउद्देशीय संस्था पानोरा या संस्थेचा पुढाकार.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- राज्यभर मार्च महिण्यापासून लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत असल्याने अजूनही पाच महिने होऊनही शाळा चालू झालेल्या नाहीत. शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेकरीता तळमळत आहेत. पण शासनाच्या धोरणामुळे त्यांना शाळेत जाता येत नसल्याने घरच्या घरी राहून विद्यार्थी कंटाळलेले आहेत. अभ्यासापासून दूर जात आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा येथे जि. प. शाळेत 1 ते 7 वर्ग असून पटसंख्या 60आहे. शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन, गटागटाने, मार्गदर्शन करुन अध्यापनाचे काम आताही करत आहे. पण यात म्हणावे तसे यश ना विद्यार्थ्यांना ना शिक्षकांना मिळत नसल्याची खंत आहे.
त्यामुळे गावातीलच शूर मावळे बहुउद्देशीय संस्था पानोरा या संस्थेतील काही होतकरु व उच्चशिक्षित विद्यार्थीवर्गांच्या मनात विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहावणे झाले नाही. तसेच त्यांनाही स्वतःचे काँलेज बंद असल्याने ते ही अभ्यासापासून सद्या दुरच असून गावातच राहत आहेत. त्यातील काही विद्यार्थी एम.पी,एस.सी.ची तयारी ही करत असल्याने आपल्या अभ्यासासोबत विद्यार्थांनाही मार्गदर्शन करुन आपलाही अभ्यास करता येईल या सुज्ञ भावनेतून जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करण्याची त्यांच्यात ईच्छा जागृत झाली. त्यांनी तशी भावना संस्थेचे प्रमुख श्री.जनार्धनजी ढुमणे जे शाळेचे शा.व्य.समितीचे सदस्य आहेत. त्यांच्याजवळ बोलून दाखविली. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील उईके यांच्याशी संपर्क साधला. मुख्याध्यापक यांनी या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता या तरुणांना होकार दिला पण सुचनाही केल्या की, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि पालकांची परवानगी मिळाल्यासच आपण वर्ग चालू करावेत. तशा पालकांना सुचना देण्यात आल्यात आणि पालकांनीही विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन आपल्या पाल्यांना गावातीलच विद्यार्थ्यांकरीता असलेल्या वाचनालयामध्ये दि.24/8/2020 पासून हे अध्यापणाचे वर्ग चालू केलेले आहेत.
दररोज वर्गवार विद्यार्थी सकाळी 7.30 वाजतापासून एक तासाच्या अंतराने तिथे जाऊन विषयवार अभ्यास घेत आहेत. यावेळेस एका वेळेस एकच वर्ग घेतल्या जात आहे. दिवसभर हे वर्ग चालू राहून जवळपास संध्याकाळी पाच वाजता पर्यंत वर्ग चालू असतात. यात कोरोनाच्या दृष्टीकोनातून सर्व सुरक्षिततेचे उपाय राबविले जातात.
दिवसभरात वर्ग 5 ते 8 चा गणित वतीश डोके हा युवक घेतो, वर्ग 1 ते 4चा गणित अतुल गिरसावळे हा युवक घेतो. 1 ते 5 चा मराठी हेमंत मेश्राम हा युवक घेतो. 1 ते 4 चा इंग्रजी राहुल मंडरे हा युवक घेतो. 5 ते 8चा विज्ञान शैलेंद्र बडगे हा युवक घेतो तर वर्ग 5 ते 8 चा इंग्रजी उत्तम चरडे हा युवक घेतो. मान.नामदेवजी राऊत शि.वि.अ.तथा मा.सुनील मुत्यलवार केंद्रप्रमुख यांच्या प्रेरणेतून हे वर्ग सगळीकडे सुरु व्हावेत असे प्रयत्न भंगाराम तळोधी केंद्रात सध्या प्रगतीपथावर आहेत.

या अध्यापन प्रक्रीयेकरीता जि.प.शाळेने फलक, बसण्याकरीता बेंच पुरविले आहेत.आवश्यक सहकार्य करण्याची हमीही दिली आहे.
अशाप्रकारे सद्या शाळा बंद पण या होतकरु युवकांच्या माध्यमातून माञ शिक्षण चालू असून विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या चेहऱ्यावर माञ आनंद ओसंडून वाहत आहे. सर्वच विद्यार्थी या ज्ञानगंगेत सामील होऊन ज्ञान ग्रहन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने