Top News

राज्यातील सर्व धर्मियांचे धार्मीकस्थळे खुले करण्यात यावी राजुरा भाजपाची मागणी.

माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राज्यात कोविड 19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने मागील मार्च महिन्या पासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद केलेली आहे.लाकडाऊनच्या काळात जनतेने राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले,परंतु आता राज्य शासनाने व्यसनाधीन नागरिकांची सोय व्हावी ह्या करिता मदिरालये सुरू केली,परंतु दुसरी कडे आपल्या आराध्य श्रध्दास्थानासमोर लीन होण्याकरिता धार्मीक प्रार्थना स्थळे मात्र सुरू केली नाही. सध्याच्या परिस्थितीत मानसिकदृष्ट्या खचलेल्या नागरिकांसाठी त्यांची धार्मीक स्थळे सुरू करावीत या मागणी करिता माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली,भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे घंटानाद आंदोलन राजुरा शहर व तालुक्यात करण्यात आले.

सर्व धर्माचे धार्मीक मंदिरे सुरू करण्यात यावी हि जनतेकडून मोठी मागणी होत असतानाही शासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.
त्यामुळे जनतेच्या ह्या महत्वपूर्ण मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आज दिनांक 29 आगस्ट 2020 ला राजुरा शहरातील व तालुक्यातील विविध धार्मीक स्थळा समोर घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहो,ह्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देवून सर्व धर्मियांची धार्मीक स्थळे तात्काळ चालू करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे करण्यात आली आहे.यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात "दार उघड उद्धवा,दार उघड"या घोषणा देवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला,तसेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांना भाजपा शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, भाजपा नेते सतीश धोटे,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य विनायक देशमुख,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,नगर सेवक राधेश्याम अडानिया,भाजपा नेते महादेव तपासे,संजय उपगनलावार,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,मंगेश श्रीराम,विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मोहन कलेगुरवार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राहुल थोरात, सय्यद कुरेशी,प्रकाश आस्वले,कैलास कार्लेकर,संदीप गायकवाड, विलास खिरटकर,आदित्य भाके, नितीन बामरटकर,प्रशांत साळवे,अनिल खणके, सुधीर आर्किलवार,संदीप मडावी,आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने