पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना सरकारने तात्काळ मदत द्यावी:- प्रा.अतुल देशकर

Bhairav Diwase
लोकांच्या बचावासाठी NDRF च्या टीम ची केली मागणी.

पूरस्थितीची केली पाहणी.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- गोसेखुर्द, संजय सरोवर, तोतला डोह व पुजारी टोल्याचे पाणी सोडल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावांना पूर आलेला आहे. ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी तालुक्यातील गावात जाऊन पूर स्थितीची पाहणी केली व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाय योजना करण्यास सांगितले. या वेळी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर लोकांच्या मदत कार्यासाठी NDRF च्या टीमची मागणी केली आहे.


लाडज वासीयांच्या मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.