Top News

प्रहार च्या लढ्याला मिळणार मोठे यश जिल्ह्यतील शेकडो शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे वनपट्टे.

Bhairav Diwase. Aug 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलालगत शेकडो भूमिहीन शेतकरी आपल्या परिवाराची गुजराण करण्यासाठी 1965 ते 70 पासून पिढ्यान पिढ्या शेती करत होते त्यासाठी हे वनपट्टे आपल्या नावावर होण्यासाठी
प्रशासनाकडे अर्जही दिले होते पण हे प्रकरण आज तागायत प्रलंबित होते काही दिवसांपासून ही शेती न करण्याचे जंगल प्रशासनाने नोटिसा सुद्धा या शेतकऱ्यांना दिल्या होत्या तर काहींची शेती सुद्धा ट्रॅक्टर च्या साह्याने नासधूस केल्या होत्या..जिल्ह्यातील या बाधित शेतकऱ्यांनी हक्काचे वनपट्टे आपणास मिळावे म्हणून सर्वच पक्षाकडे गेले असता त्यांना योग्य तो अभिप्राय मिळाला नाही शेवटी 12 गावातील शेतकरी ज्यात कोलारा,टेकेपार,बामहंगावन,सातारा,अलीजंजा,किटाळी, तळोधी,पिपर्दा, पळसगाव,मदनापूर,करवडा या गावातील शेतकऱ्यांनी प्रहारचे कार्यकर्ते शेरखान पठाण यांना आपली
समस्या सांगितली शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याया मुळे त्यांनी प्रशासनाशी लढा देण्याचे ठरविले.सर्वप्रथम या समस्येविषयी वंदनीय मंत्री महोदय बच्चूभाऊ यांचेशी चर्चा केली व त्यांच्या मार्गदर्शनात हा विषय जिल्हाधिकारी साहेब
चंद्रपूर यांचे कडे लावून धरला व यात शेतकऱ्यांचे कसे नुकसान जंगल प्रशासन नुकसान करत आहे याची प्रचिती आणून दिली व परंपरागत जमीन मालकास हे वनपट्टे देने हा त्या शेतकऱ्यांचा अधिकार असून त्यासाठी लढा देण्याची
तयारी प्रहार जनशक्ती पक्ष तयार असल्याचे ठणकावून प्रशासनाला दाखवून दिले.या धर्तीवर जिल्हाधिकारी श्री खेमणार साहेब यांचे सोबत प्रहार सेवक शेरखान पठाण, वामन बावणे,देविदास सहारे,तुलसी रामटेके ,कृष्णा व 12 गावातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांचे सोबत सकारात्मक चर्चा झाली व यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी 2004 पूर्वी पासून वहिवाट आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना निकशासह वनपट्टे देण्याचे मान्य केले तसेच या संदर्भात संबंधित sdo याना तसे निर्देश देण्याचे सांगितले येत्या 20 तारखेपर्यंत हा वनपट्टे संबंधित शेतकऱ्यांना देण्याची माहिती जिल्हाधिकारी साहेब यांणी प्रहार सेवक शेरखान पठाण व शेतकरी प्रतिनिधी यांना दिले..प्रहारच्या या लढ्याने व बच्चू भाऊंच्या प्रयत्नांने शेकडो शेतकऱ्यांना हक्काच्या भाकरीची व्यवस्था होणार आहे तर प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी वंदनीय बच्चूभाऊ यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असणार असे प्रहार सेवक शेरखान पठाण यांनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने