Top News

राष्ट्रीय महामार्ग देवघाट पुलावरील जिवघेणार खड्डा बुजवा.

३० ऑगष्ट पूर्वी खड्डे बुजवा अन्यथा १ सप्टेंबर पासून रस्ता खोदो आंदोलन करणार.

जनस्त्याग्रह चे अध्यक्ष अबिद अली यांचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 22, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजूरा आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग म्हणून शासनाने घोषणा केली सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही म्हणून गेल्या दोन वर्षापासून डागडुगी व दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करीत आहे गडचांदूर ते तेलंगाणा सिमे पर्यंत ३५ कि मी रस्ता खड्डेमय पावसाच्या पाण्याने अपघाताला आमंत्रण देत असल्याचे. चित्र निर्माण झाले आहेत अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतुक. खंडीत झाल्याचे अनेक घटना घडल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेकांनी आपला जीव गमावला पुलाच्या मध्यभागी ठिक ठिकाणी खड्डे पडल्या ने व पुलाचे.सुरक्षा कठडे पडल्या ने खडडे चुकविण्याचे प्रयत्नात काही दिवसापुर्वी पुला खाली ट्रक कोसळून चालकाला जिव गमवावे लागले आसन ते कोरपणा व पुढे परसोडा सीमा पर्यंत अनेक ठिकाणी पावसाने खड्डे निर्माण झाल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दहा कोटीचा निधी खर्च करून रस्त्यातील खड्डे बुजवणे व काही ठिकाणी नूतनीकरण डांबरीकरण करून विकास कामाचा मुलामा लावण्यात आला मात्र डांबरी करणाचे तीन तेरा वाजले खड्डेमुक्त महाराष्ट्र चाणारा दोन वर्षातच खड्डेमय रस्त्यात रूपांतर झाला यामुळे नागरिकांना डोकेदुखीचा राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे या क्षेत्रातील कोळसा सिमेंट उद्योग अधिभारवाहनांची वर्दळ यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली गडचांदूर परसोडा कोरपना कोड सी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करा देवघाट पुलावरील खड्डा मेहंदी पुलावरील खड्डे ३० ऑगस्ट पुर्वी बुजवा अन्यथा १ सप्टे रोजी देवघाट पुलावरील रस्ता खो दो आंदोलन करण्याचा इशारा जनसत्याग्रह संघटने चे अध्यक्ष आबीद अली यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने