साईशांति युवा गणेश मंडळ गडचांदूर च्या वतीने २४ ऑगष्ट ला रक्तदान शिबिराचे आयोजन.

शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करून शिबीर होणार संपन्न.

जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आव्हान.
Bhairav Diwase. Aug 22, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येत्या २४ तारखेला साईशांति युवा गणेश मंडळाच्या वतीने साईशांति नगर, शिक्षक कॉलोनी प्रभाग क्रमांक 2 येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. मंडळातर्फे दरवर्षीच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमाचे पालन करून शिबीर पार पाडणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आव्हान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत