बँका मार्फत चालणाऱ्या केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा:- खासदार अशोक नेते यांनी घेतला जिल्ह्यातील सर्व बँकांचा आढावा.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase. Aug 14, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर

गडचिरोली:- देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्याबरोबर गरीब, गरजू, शेतकरी व कामगार वर्गासाठी विविध विमा योजना अंमलात आणल्या व या योजनांचा लाभ बँकांमार्फत देण्यात येत आहे मात्र बँकेचे अधिकारी जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा लोन, पंतप्रधान जन-धन योजना इत्यादी योजनांचे खाते उघडण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक गरजु, गरीब नागरिक केंद्राच्या योजनांपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यन्त या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांनी केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.

दि. 13 आगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक व नाबार्डच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला दिशा समितीचे सदस्य तथा भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना समितीच्या सदस्य रेखाताई डोळस, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, नाबार्डचे अधिकारी राजेंद्र चौधरी, व सर्व बँकांचे व्यवस्थापक/ जिल्हा समनव्यक उपस्थित होते.*
या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी केंद्राच्या सर्व विमा योजना, पीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, व शेतकऱ्यांसाठीच्या इतर योजनांचा सविस्तर आढावा घेतला व शेतकरी, गरीब, गरजू व सर्वसामान्य नागरिकांना सदर योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करून केंद्राच्या योजनांची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

मुद्रा योजने अंतर्गत जिल्ह्यात 3 वर्षांत 270 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आढावा घेतला असता मार्च 2018 पर्यन्त मुद्राच्या शिशु योजनेअंतर्गत 3449 लाभार्थ्यांना 1522.04 लक्ष , किशोर अंतर्गत 1020 लाभार्थ्यांना 2131.29 लक्ष रुपये तर तरुण अंतर्गत 205 लाभार्थ्यांना 1615.09 लक्ष रुपये असे एकूण 4674 लाभार्थ्यांना 5268.78 लक्ष रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. तर मार्च 2019 पर्यन्त शिशु- 4279 लाभार्थी 1955.103 लक्ष, किशोर- 2397 लाभार्थी 4321.07 लक्ष रुपये, तरूण- 271 लाभार्थ्यांना 2167.875 लक्ष रुपये असे एकूण 6947 लाभार्थ्यांना 8443.985 लक्ष रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले तसेच मार्च 2020 पर्यन्त शिशु- 4722 लाभार्थी 2204.67 लक्ष रुपये, किशोर- 2768 लाभार्थी 4912.66 लक्ष रुपये, तरुण- 277 लाभार्थ्यांना 2237.38 लक्ष रुपये असे एकूण 7767 लाभार्थ्यांना 9355.71 लक्ष रुपयांचे कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले तर मार्च 2017 पासून ते मार्च 2020 पर्यन्त 3 वर्षात एकूण 19388 लाभार्थ्यांना 230 कोटी 67 लक्ष रुपयाचे कर्ज मुद्रा योजने अंतर्गत देण्यात आल्याची माहिती नाबार्डचे अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी जुन्याच कर्ज घेणाऱ्या खातेधारकाना मुद्रा योजनेचे कर्ज न देता गरीब, गरजू व नव्याने उद्योग सुरू करनाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना बँकाच्या अटीशर्थी मध्ये शिथिलता देऊन कर्ज उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच केंद्राच्या सर्व विमा योजनांअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांचे खाते उघडून त्याचा लाभ देण्याचे निर्देश दिले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत 2000 रुपयाचे अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)