एसडीओ मार्फत दिले मुख्यमंत्री यांना निवेदन.
Bhairav Diwase. Aug 14, 2020
चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोसर्ला येथील एका मुलीवर अत्याचार केल्याने त्या मुलीने आत्महत्या केली त्या घटनेचा निषेध व्यक्त करीत त्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुंडागर्दी वाढली असून महिला वर्गात भीती चे वातावरण पसरले असून महिला असुरक्षित आहे अश्यातच मौजा कसर्ला तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील एका मुलीवर अत्याचार केला नैराश्यपोटी त्या मुलीने आत्महत्या केली या निंदनीय कृत्याचा निषेध भाजप महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत असून त्या तथाकथित नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून त्या मुलीस न्याय मिळेल
कोसर्ला अत्याचार व आत्महत्या घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला आघाडी तालुका चिमूर ने केली असून राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी माजी पस सदस्य माया ननावरे आशा मेश्राम रत्नमाला मेश्राम पुष्पा हरणे मनीषा कावरे प्रिया जयकर आदी महिला उपस्थित होते.