गावकऱ्यांचा सहभागातून गावाची प्रतिमा विकासाच्या टोकाला.
Bhairav Diwase. Aug 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मंगी (बु) येथील गावकऱ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर गावाला धूर, हागणदारी, प्लास्टीक व दारूमुक्त करून विकासाला नवी चालना दिली आहे. विशेष म्हणजे ग्राम पंचायत प्रशासनाने शासकीय निधी व्यतिरिक्त लोकसहभागातून गावाचा कायापालट केल्याने या 'विकास मॉडेल' चा आदर्श इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरत आहे. मंगी (बु) गट ग्राम पंचायतमध्ये खैरगुडा, कुडमेथेगुडा, रांजीगुडा, मंगी (खु.) या गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीने विकासाच्या जोरावर स्मार्ट व्हिलेजचा ११ लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून गावाची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. गावात रस्ते, स्वच्छता या विकासासोबतच लोकसहभागातून गावाला धूरमुक्त केले आहे. ग्रामस्थांनी घराशेजारी शोषखड्डू तयार केल्याने सांडपाण्याचा प्रश्नही सुटलेला आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधण्यात आले आहे त्यामुळे गाव हागंदारी मुक्त झालेला आहे. स्वच्छतेच्या जोरावर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. त्यातूनच ८ लाखांच्या आरो प्लांटमधून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. गावाच्या प्रवेशव्दारावर सुंदर व मनमोहक बगीचा तयार करण्यात आल्याने गावसुंदर व हिरवगार दिसत आहे. तसेच अंगणवाडीचे सुशोभीकरण करण्यात आले. खुली व्यायामशाळा उपलब्ध झाल्याने त्या नियमित वापर, शाळा सुध्दा इतरांच्या नजरेत भरावी अशी सुविधायुक्त व्यवस्था होत आहे. गावकऱ्यांरी विकासासोबतच आध्यात्मिक व सर्वधर्मसमभावाची किनार दिली आहे. ग्राम पंचायतीने पाच वर्षापासून गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विकासावर भर दिला आहे.
मंगी (बु) गावात विकासाचा महामेरु उदयाला येण्यासाठी श्रीकांत कुंभारे, कार्यक्रम अधिकारी, अंबुजा सिमेंट फाऊन्डेशन, उपरवाही यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. वेळोवेळी मार्गदर्शन तथा आर्थिक सहकार्य होत आहे. ग्राम पंचायत प्रशासन सौ. रसिकाताई पेंदोर, सरपंच, वासुदेव चापले, उपसरपंच, शंकर तोडासे सदस्य, वंजारे ग्रामसेवक, रत्नाकर भेंडे मुख्याध्यापक यांची यासाठी खुप मेहनत आहे.