मार्केंडेश्वर विद्यालय जवळील घटना.
दोन्ही जखमींना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचार्थ भरती.
Bhairav Diwase. Aug 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- परस्पर समोरासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या. दोन दुचाकी ची धडक होऊन दोन्ही दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली (दुपारी १.००वा) , राजेंद्र मोटघरे(३५) वर्ष,रा.बोथली हेटी,विरु बिके(३०) रा किसाननगर, असे दोन्ही जखमीचे नाव असून जखमींच्या पाय, आणि डोक्यावर मार असल्याने उपचारार्थ जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
राजु मोटघरे आपल्या दुचाकी एम एच ३४, बी के ९०१० या दुचाकी नेकामानिमित्त बोथली येथे आला होता, काम आटोपून तो आपल्या गावाकडे बोथली वरुन हेटि कडे जात असताना किसानगर येथील एम एच ३४,व्ही के, १०३५ या दुचाकी ने किसान नगर ते बोथली (व्हाया हिरापुर मार्ग) येताना दोन्ही दुचाकीची इंदिरा नगर ,बोथली येथील मार्केंडेश्वर विद्यालय जवळ समोरासमोर धडक झाली ,घटनेची माहिती होताच पोलिस विभागासह गावातील नागरिक धावून आले, जखमींना बोथली येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात भरती करण्यात आले, त्यानंतर सावली येथील ग्रामीण रुग्णालयात तर गंभीर मार असल्याने गडचिरोली येथे सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.पुढील तपास योगेश भेंडारे पोहवा, चंद्रकांत कन्नाके पोहवी करीत आहेत