त्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उलगडले.
चालू गाडीवर वार करून केले ठार.
Bhairav Diwase. Aug 21, 2020
नागभीड:- तहसील अंतर्गत येणाऱ्या मागंली येथील गुरुदेव तुळशीराम चौधरी वय 36 वर्ष हा 17 ऑगस्ट रोजी नागभिड येथे रेल्वेत नौकरी करून सायंकाळी 7 चे सुमारास गावाला जात असताना बामणी गावाजवळ दोघांनी चालू गाडीवर वार करून खून केला.
त्यानंतर अक्षय वसंता पांडव वय 22 राहणार नवेगाव हंडेस्वरी व प्रियकर गिरिधर गेडाम वय 40 हे दोघेही फरार झाले. नागभिड येथील पोलिस स्टेशन येथे 22/2020 गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी कलम 188 नुसार पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी गुन्हा कबुल केला असून प्रियकराने पतीला ठार मारण्याची सुपारी दिली होती असे प्रियकराने सांगितले असून पोलिसांनी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तोपर्यंत पोलीस उपनिरीक्षक वैभव कोरवाते करीत आहे. दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास बाकी असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
आधीच्या माहिती नुसार नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत बाम्हणी - मांगली मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात इसमाचा मृतदेह आढळल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात होता.
गुरूदेव तुळशीराम चौधरी (४२) रा.मांगली (अरब) असे मृतकाचे नाव असून. तो रेल्वे विभागात नागभीड रेल्वे स्टेशनवर नोकरीवर कार्यरत होता. काल सायंकाळी ७ च्या सुमारास तो रेल्वे स्टेशन वरून घरी येण्यासाठी स्वतःच्या दुचाकी स्कुटीने निघाला. वाटेतच मांगलीकडे जाताना बाम्हणी गाव ओलांडल्या नंतर पुलावर त्याचा मृतदेह आढळला.
त्याच्या डोक्यावर जबर मार असल्याने चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसून आला. मांगली बाम्हणीच्या मधोमध पुलाजवळ झाडे झुडपे असल्यामुळे काही अज्ञात व्यक्तीनी हत्येचा कट रचून गुरूदासची हत्या केली असावी अशा चर्चास परिसरात ऊत आला होता.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह आज उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.सदर प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. मृतकाला आई,पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे.मात्र आता मृत्यूचे गूढ उकलले आहे.