अनेक धंदे झाले चौपट. धंदेवाईकावर बेकारीची कुऱ्हाड.
धंद्याच्या मंदीमुळे बेरोजगार हैराण.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- देशभरात कोरोणा चा कहर सुरू असून त्याची झळ आज ग्रामीण भागही सहन करीत आहे विशेष म्हणजे कोरोणा हा आजार ई तर देशातून आला असला तरी सदर आजार हा शहरात जाणवत होता आशि कोरोणा ग्रस्त शहरे लाकडाऊन करणे गरजेचे होते मात्र शासनाने देशच लाक डाऊन करून संचारबंदी लागू केल्याने शहरासह ग्रामीण भागातील रोजगाराची वाट लागली अनेक धंदे चौपट झाले धंद्यावर मंदी आली धंदे वाई क हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे कोरोणामुळें सारी अर्थ व्यवस्था विस्कटली शिक्षण घेऊन नोकरी नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा यासाठी अनेकांनी रोजगाराचा मार्ग निवडला कुणी चहा टपरी, हाटेल, किराणा दुकान, पानटपरी आदी रोजगार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना देशात कोरोणा चा कहर सुरू झाला आणि अनेक रोजगार चौपट झाले वाहतूक थांबल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या भावात दुपटीने वाड झाली अतिरिक्त भावाने वस्तू खरेदी करण्याची वेळ निर्माण झाली त्यामुळे आर्थिक भुर्दंड सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे काम नाही धंदे नाही आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सामान्य माणसासमोर समस्याचे डोंगर निर्माण झाले आहे नुकतेच सना सुधीच्या काळाला सुरुवात झाली असताना या काळात मूर्ती कराना ही कोरोनाचा फट का बसत आहे अनेक कार्यक्रम धार्मिक सण यावर विरजण येत आहे परिणामी सणाच्या माध्यमातून लक्ष्यावधी रुपये कमावणाऱ्याचीही मोठी गोची निर्माण झाली आहे गणेश चतुर्थी पर्वावर गणरायाच्या मूर्ती विक्रीवर मोठा परिणाम होत असल्याचे सावली येथील मूर्तिकार राजू उतूर्वार यांनी खंत व्यक्त करत लाकडाऊनने सर्वांचे कंबरडे मोडले असून सामन्याचे मोठे हाल होत असल्याचे बोलून दा खावीत आहे एकंदरीत कोरो नाच्या ला कडाऊन मुळे सामन्याचे मोठे हाल होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून धंदे वाईका सह बेरोजगार हैराण झाले आहेत.