राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसीफ सय्यद यांच्या नेतृत्वात सोंडो येथे राजुरा-आसिफाबाद महामार्गावर खड्ड्यांमध्ये बेशरमांची झाडे लावून आंदोलन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मागील अनेक दिवसांपासून राजुरा ते आसिफाबाद महामार्गावर जागो जागी जीवघेणे खड्डे पडले असून या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कित्येक दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पाठपुरावा करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सोंडो येथे राजुरा आसिफाबाद महामार्गावर खड्ड्यांमध्ये बेशरमांची झाडे लावण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, सोंडो ग्रामपंचायत सदस्य दादाजी उमरे, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, शहर महासचिव अंकुश भोंगळे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते राजू ददगाड, राष्ट्रवादी तालुका सचिव सतीश तेलजिरवार, बब्बु सय्यद, अभी सूर्यवंशी, श्रावण कालिवार व राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.