Bhairav Diwase. Aug 16, 2020
वरोरा:- साम्राज्य ग्रुप मांगली च्या माध्यमातून १५ ऑगस्ट निमित्ताने गावामध्ये बॅनर लावून शुभेच्छा दिल्या गेल्या व श्रमदान करण्यात आले यावेळी ग्रुप चे संस्थापक सुरज धोटे यांनी सांगितले. की कचरा हा कुठे आपल्या घराबाहेर पडून असेल तर आपण त्या जागेवर वावरतो त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होतात म्हणून कचरा गोळा करून तो कचरा कुडी मध्ये किंवा इतर बाहेर कुठे एक कचरा साठी जागा करून तिथे टाकाला हवा व आपण राहतो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवाला हवी तसे केल्यास आपला परिसर स्वच्छ व सुंदर दिसेल यावेळी उपस्थित ग्रुप चे मार्गदर्शक महेश देवतळे ग्रुप चे अध्यक्ष सुनील पिळीगामा, उपाध्यक्ष अमर लोनारे, व ग्रुप सभासद समर लोनारे, आकाश धोटे, विकी पिज्दुरकर, सुरज ढोके, वैभव चवले, नयन टेकाम, प्रविण धोटे, अनिकेत टेकाम, अनिल पिळीगामा, राहुल किनाके, शिवम भुसारी, भुषण धोटे, तुषार गेगाटे, इत्यादी उपस्थित होते