जांब बुज. येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील 15 km दूर असलेल्या जांब बुज. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. सदर उद्घाटनाचा कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून करण्यात आले. अगदी साध्या पध्दतीने उद्घाटन करून गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील सुध्दा अभ्यासू मुलांसाठी हे वाचनालय उपलब्ध असणार आहे. वाचनालयाचे कामकाज पाहण्यासाठी एक कार्यकारी समिती आणि एक सल्लागार समितीची सुध्या स्थापना करण्यात आलेली आहे. गावातील तसेच गावाशेजारील मुलांनी या वाचनालयात येऊन आपला अभ्यास करावा. सर्वांसाठी हे वाचनालय खुले असणार आहे.