"दार उघड उद्धवा, दार उघड मंदिराचे दार उघड. घोषणा देत राजराजेश्वर मंदिर जवळ घंटानाद आंदोलन.

Bhairav Diwase
दारूची दुकाने उघडली, बाजारपेठा उघडली,
बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मंदिरे सुरू करा या मागणी करीता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ११ वाजता राज राजेश्वर देवस्थान पोंभुर्णा येथे भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते या पवित्र आंदोलनात सहभागी झाले होते. श्री गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष पोंभुर्णा, कु.अल्काताई आञाम प. समिती सभापती पोंभुर्णा, विनोदभाऊ देशमुख पं.समिती सदस्य पोंभुर्णा, हरीजी ढवस सरपंच आष्टा, बंडूजी बुंराडे सरपंच जामखुर्द, रज्जीयाताई कुरेशी उपनगराध्यक्ष न.पं.पोंभुर्णा, अजीतभाऊ मंगळगिरीवार नगरसेवक न.पं.पोंभुर्णा, मोहन चलाख नगरसेवक न.पं.पोंभुर्णा,कु. शारदाताई कोडापे नगरसेविका न.पं.पोंभुर्णा, राजु ठाकरे, संजय कोडापे, अजित जबुलवार, राहुल वासेकर आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.