गावकऱ्यांची दुरुस्तीची मागणी.
60 शेतकऱ्यांच्या शेतीच नुकसान होण्याची भीती.
शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 13, 2020
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील गोंडपीपरी जंगलालगत मोठे तलाव आहे या तलावाला लागून 60 -70 शेतकऱ्यांची शेती आहे मागील काही वर्षांपूर्वी सदर तलावाला पाट बांधण्यात आला होता, शेतकरी पाटाच्या पाण्यावर शेतीपीक घेत असत, आजघडीला पाटाची दुरावस्था झाली असून पाटाला झाडानी वेळले असून ,पाटाचे खोलीकरण नसल्याने पाट पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत आहे . शेतकऱ्यांनी जि. प.पाटबंधारे सिंचाई विभाग यांचेकडे अर्ज केला आहे. साईनाथ मास्टे, संजय झाडे, मारोती झाडे, विलास निमरड, संदीप ठुसे यांनी निवेदन दिले. सदर समस्याचा निपटारा 10 दिवसाचे आत झाला नाही तर कुटुंबासहित उपोषणाला बसण्याचा इशारा मारोती झाडे, विलास निमरड, संदीप ठुसे, दादाजी झाडे व इतर या शेतकऱ्यांनी दिला आहे.