Click Here...👇👇👇

स्वातंत्र्य दिनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घारे साहेब यांना सन्मानचिन्ह.

Bhairav Diwase
1 minute read
Bhairav Diwase. Aug 19, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुका अंतर्गत दोन पोलीस स्टेशन असून कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पाथरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घारे यांची नियुक्ती करण्यात आली. या पोलीस स्टेशन अंतर्गत गेवरा चौकी असून 39 गावे येतात व 32 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात जनतेची काळजी घेत अनेक उपक्रम राबविण्यात आले. अशा दुर्गंम भागात काम करीत असताना अडचणींचा सामना करीत मोलाची कामगिरी केली. त्यामुळे माननीय पोलीस महासंचालक यांचे अंतरिम सुरक्षा पोलीस पदक प्राप्त झाले. 74 व्या स्वतंत्र दिनी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेश्वर जी रेड्डी साहेब यांच्या हस्ते स. पो. नि. घारे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.