Bhairav Diwase. Aug 13, 2020
राजुरा:- राजुरा तालुक्यातील नोकारी हे आदिवासी बहुल गाव 250 कुटूंब असलेल ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्य संख्या आहे सरपंच लता उईके उपरपंच वामन तुराणकर आहेत आणि पेसा योजनेत या गावाचा समावेश आहे त्यामुळे ग्राम विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळत आहे परंतु आदिवासी बहुल अशिक्षित बहुतांश नागरिक,असल्याने येथील उपसरपंच हे पदाचा गैरवापर करीत दबाव तंत्र वापरून गावातील कामाचे कंत्राट स्वताच घेत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करीत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला पत्रकार मंडळींना गावात बोलावून ग्रामस्थानी भ्रष्टराचाराचा पाढाच वाचला नुकतेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संडास बांधकाम करण्यात आले याचे बांधकामः कंत्राट उपसरपंच यांनीच घेतले परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे, आणि अपूर्ण कामे केलीत कित्येकांचे संडासाचे टाकी बांधली नाही,काही ठिकाणी टाकीवर स्लॅब नाही त्यामुळे लोक बांबूचे ताटवे टाकून ठेवले आहेत काही ठिकाणी सीट, दरवाजे सुद्धा बसविले नाही, प्लास्टर नाही अशी दुरावस्था आहे.
आणि हे कामे पूर्ण झाल्याचे सांगून निधी पूर्ण खर्च केल्याचे सांगण्यात आले तसेच 3 लाख रुपये खर्चून 50 मीटर सिमेंट कांक्रीट रस्ता करण्यात आला परंतु 2 महिन्यातच उखडला गेला,आदिवासींचे श्रद्धा असलेले सगा शक्ती केंद्राचे पेसा अंतर्गत कामातही निकृष्ठ दर्जाचे सिमेंट,रेती आणि इतर मटेरियल वापरण्यात आला अशारितीने गावातील विकासाचे कामात लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार उपसरपंच यांनी केला असा आरोप ग्रामस्थानी केला एवढंच नाही तर गावातील नाल्याची साफसफाई करण्यात आले नसल्याने गावात घाण पसरली असून जनतेचे आरोग्य धोक्यात आहे असे असतानाही ग्रामसभेत कुणी विचारणा केला तर त्याचेवर दबाव आणीत असतो त्यामुळे या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून अट्रॅसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.