बेंबाळ येथे लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी दि.२०/०८/२०२०ला लसीकरण शिबिर संपन्न.

Bhairav Diwase. Aug 21, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल

मुल:- काही दिवसांपासून शेतकरी बांधव आपल्या जनावरांचे आरोग्य बिघडत असतांना व परिसरात साथीचे रोग मोठ्याप्रमाणात पसरत असल्याने आपल्या जनावरांची तपासणी करणे खूप गरजेचे झाले होते पण उपचारासाठी त्यांना नांदगावला नेणे गरजेचे झाले होते पण नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कसरत करावी लागत होती..ही बातमी मूल पंचायत समितीचे सभापती श्री.चंदूभाऊ मारगोनवार यांना कळताच त्यांनी जनावरांच्या आरोग्याची तपासणी लवकरात लवकर व शेतकऱ्यांच्या सोयीने करण्यासाठी अधिकारी व डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला व आज बेंबाळ येथे शिबीर आयोजित केला..
यावेळी २९० निरोगी जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली व १८७ आजारी जनावरांचे उपचार करण्यात आले.शेतकरी बांधवांना आपल्या बळीराजाच्या जीवनासाठी अत्यावश्यक लस मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांप्रती दिलासा मिळालेला आहे.
याप्रसंगी उपस्थित मूल पंचायत समितीचे सभापती मा.श्री.चंदुभाऊ मारगोनवार,श्री.जांभुळे साहेब पशुधन विकास अधिकारी मुल ,बेंबाळचे उपसरपंच मुन्नाभाऊ कोटगले,श्री.गुरुदासजी राऊत अध्यक्ष तं.मु.समिती बेंबाळ,श्री.विशाल भाऊ कत्रोजवार अध्यक्ष शा.व्य.समिती बेंबाळ,श्री.नंदूभाऊ आकनूरवार,श्री.मेटे साहेब पशुधन पर्यवेक्षक मुल,श्री.भुसारी साहेब सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नांदगाव, श्री.नवनाथजी वाढई,श्री.विठ्ठल राऊत ,नांदगाव गडिसुर्ला (परिचर)आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने