Top News

घाटकुळ व नवेगाव मोरे गावात लंप्पी रोगावर लसीकरण शिबिर.

Bhairav Diwase. Aug 14, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्गजन्य रोग लंपीस शेतकऱ्यांची झोप उडविलेली आहे. ऐनकामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. लंप्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.
हीच परिस्थिती लक्षात घेऊन पंचायत समितीचे सदस्य विनोदभाऊ देशमुख यांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून घाटकुल आणि नवेगाव मोरे या गावात लंपीस या रोगावर लसीकरण शिबीरचे आयोजन करण्यात आले. या लसीकरण शिबिरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. डॉ. जी. एस. लाडे. यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. लाडे आणि त्यांचे सहकारी हे शिबीर राबवत आहेत.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य विनोदभाऊ देशमुख, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. लाडे, व त्यांचे सहकारी, पशु सखी छाया हसे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने