Bhairav Diwase. Aug 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- पिंपळगाव नदीवर पुलियाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नागरीकांना ये जा करण्याकरिता बाजूने सिमेंट पाईप टाकून रपटा बनविला होता परंतु मोठया पावसाने तो वाहून आले.
नवतळा, पिंपळगाग येथील नागरीकांना ह्या रस्त्याने ये जा करतात सध्या नागरीकांना खूप अडचणी होत आहेत त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर दखल घेत व्यवस्था करून देण्यासाठी नवतळा येथील उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते महादेव कोकोडे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री बंटीभाऊ भांगडीया यांचेकडे मागणी केली असून बांधकाम विभागाला सूचना दिलेल्या आहेत.