Top News

गावं कुपोषमुक्त करण्यासाठी लोकसहभाग गरजेचा:- दीपक चटप.

पिपरी येथे कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स वितरण.

पाथ फाऊंडेशन व डॉ. गिरिधर काळे सामाजिक प्रतिष्ठान यांचे आयोजन.
Bhairav Diwase. Aug 14, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील पिपरी या गावात 'जाणिव माणुसकीची' अभियानांतर्गत पोषण आहार किट्स वितरित करण्यात आल्या. या गावात तीन बालक ही कुपोषणग्रस्त असून या सर्वांना मोफत पोषण आहार किट देण्यात आली. यावेळी पाथ फाऊंडेशनचे दीपक चटप यांचा पिपरी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोरपना तालुक्यातील ३५ गावात ६० कुपोषित बालक आहेत. या सर्वांना मदत पोहचविण्याचे कार्य लोकसहभागातून सुरू असून कुपोषित बालकांना प्रत्यक्ष भेट देऊन अंगणवाडी सेविकांच्या मार्फत वजन, उंची, वय, दंडघेर आदी तपशील घेण्यात येत आहे. दोन महिन्यानंतर आणखी कुपोषित बालकाचा तपशील घेण्यात येईल. लोकांमध्ये कुपोषणाबाबत जनजागृती व्हावी व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बालकं कुपोषमुक्त व्हावे यासाठी आम्ही कार्यरत राहू असे दीपक चटप यांनी सांगितले. आमचे मित्र अविनाश पोईनकर यांनी कोरपना तालुक्यात गरजू कुपोषित बालकांसाठी कोरोना काळात मदत पोहचविणे निकडीचे झाल्याचे सांगितले. आम्ही एकत्रित येत तालुका बालविकास अधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संपूर्ण तालुक्यात लोकसहभागातून जाणिव माणुसकीची अभियान राबविले. गावातील लोकांनी पुढाकार घेऊन गावं कुपोषमुक्त केली तर निश्चितच तालुका सकारात्मक दिशेने वाटचाल करेल असेही चटप यांनी मांडले.

जाणिव माणुसकीची अभियान
कौतुकास्पद असून गावोगावी प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेले मदतकार्य वाखाण्याजोगे असल्याचे मत पिपरी येथील सरपंच कवडू कुंभारे यांनी मांडले. यावेळी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल चांदेकर यांनी पिपरी हे गाव कुपोषमुक्त व्हावे यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आणि दीपक चटप, अविनाश पोईनकर यांच्या माध्यमातून तालुक्यात कुपोषणमुक्तीसाठी चालू असलेली मोहीम ही प्रशंसनिय असल्याने या सत्कार्यात प्रत्यक्ष सहभागी नोंदवला. तसेच, आमच्या गावातील कुपोषित मुलांसह तालुक्यात कुपोषित बालकांना लोकसहभागातून ही झालेली मदत कौतुकास्पद असल्याचे मत चांदेकर यांनी मांडले.

पिपरी गावातील नागरिक, अंगणवाडी सेविका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर, संतोष उपरे, अक्षय चांदूरकर, ऋषी चटप यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने