शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

Bhairav Diwase. Aug 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे नुकतेच रुजू झालेल्या जिल्हाधिकारी अजय गुलाने यांचे लक्ष वेधण्यासाठी आज यंग चांदा ब्रिगेडच्या शेतकरी विभागाच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी खतांची टंचाई, लंपी रोग, पांधन मार्गे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शेतकरी विभागाचे प्रभाकर धांडे, जंगलू पाचभाई, राकेश पिंपळकर, विलास सोमलवार आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या