Bhairav Diwase. Aug 18, 2020
कोरपना:- महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) महासंघाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. यात कोरपना तालुक्यातील बिबी येथील सामाजिक कार्यकर्ते वासुदेव बेसुरवार यांची विदर्भ सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील धोबी समाजाच्या प्रश्नांसाठी शासन व व्यवस्थेविरोधात लढा उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संघटनासह ते कार्यरत आहेत. राज्यस्तर ते ग्राम पातळीपर्यंत राज्यातील ३० लाख धोबी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय हक्काच्या ऐतिहासिक लढ्यातील नेतृत्व म्हणून त्याची ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.डी.सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, महासचिव जयराम वाघ, विदर्भ अध्यक्ष शंकर परदेशी यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल बेसुरवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.