राजुरा येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीत 100 खाटाचे कोविड सेंटर सुरू करावे.

Bhairav Diwase
माजी आमदार अँड संजय धोटे यांची मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.
Bhairav Diwase.    Sep 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोना रुग्णासाठी बेड ची कमतरता भासून राहली आहे,राजुरा येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाची ईमारत असून यानुषंगाने या इमारतीत 100 बेडची व्यवस्था होईल एवढी मोठी ईमारत असून सदर ईमारतीत प्रशस्त खोल्या सुध्दा आहे तरी या इमारतीत 100 खाटचे कोविड सेंटर बनवून रुग्णाची गैरसमज दूर करावी अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
        माजी आमदार अँड यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ आज मा.जिल्हाधिकारी यांना भेटून विविध समस्या संदर्भात अवगत केले,राजुरा तालुक्यात रुग्णाची संख्या वाढत असल्याने, सदर इमारतीत बेड उपलब्ध करून देण्यास व ईतर व्यवस्था केल्यास सदर इमारतीचा उपयोग होऊ शकेल,याबाबतची माहिती मा.पालकमंत्री मोहदयाना सुद्धा देण्यात आली आहे, तसेच मागणी सुध्दा करण्यात आली आहे,राजुरा तालुक्यातील सास्ती, धोपटाळा येथे WCL चे रुग्णालयाच्या इमारती मध्ये सुद्धा कोविड सेंटर म्हणून रुग्णालय म्हणून वापरता येईल,त्या रुग्णालयात पण कोविड रुग्णासाठी सोयीस्कर होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
          या शिष्टमंडळा मध्ये माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की,जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे,नगर सेवक राधेश्याम अडाणीया,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश रागीट,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर आदी उपस्थित होते.