पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनोद देशमुख सदस्य पं स पोंभुर्णा यांचेकडून गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्व. पं. दिनदयाल उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.ते प्रखर राष्ट्रवादी,एकात्मक मानव वादाचे प्रगतशील विचार जण माणसात रुजवणारे मग्न विचारवंत ,कुशल संघटक भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. भारत देश हा एक मजबूत व सशक्त देश बनावा असे त्यांना वाटत होते.अश्या या महान पुरुषांची जयंती पोंभुर्णा पंचायत समितीचे सदस्य विनोद देशमुख यांच्या संकल्पनेतून प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले. व त्यांच्या जयंती निमित्याने विनोद देशमुख यांचेकडून घाटकुळ गावातील अपंग व गरीब गरजू जनतेला ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. 
                      त्यावेळी पंचायत समितीचे सदस्य विनोद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते चांगदेव राळेगावकर, साईनाथ मेदाडे, स्वप्नील बुटले, व्यंकटेश राळेगावकर, मुकुंदा हसे, विठ्ठल धंदरे, योगेश देशमुख, अनिल मडावी, चंद्रशेखर बोरकुटे, उपस्थित होते.