चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टीटयुट, पोंभुर्णा मधील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच आंदोलन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- महाविद्यालय व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीने गुरुवारी पुकारलेल्या राज्यव्यापी लेखणी व औजार बंद आंदोलनात चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टीटयुट , पोंभुर्णा येथील शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवाणी पाठींबा दर्शवून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा. सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवन आदी प्रलंबीत आहे. याकरीता चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टीटयुट , पोंभुर्णा मधील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलणाच्या तिसऱ्या दिवसी उत्स्फुर्तपणे सहभाग दर्शवून आंदोलनात सहभाग घेतला.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा प्रशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव श्री अतुल अल्याडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन होत आहे.