सर फाऊंडेशन चंद्रपूर जिल्हास्तरिय"शिक्षक सन्मान 2020"पुरस्काराने अर्चना जिडकुंटावार सन्मानित.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- सर फाऊंडेशन (SIRF) महाराष्ट्र राज्य उपक्रमशील शिक्षकांचे राज्य स्तरावरील विशाल नेटवर्क असलेले (State Innovation and Research foundation) फाऊंडेशन आहे.
"शिक्षक सन्मान 2020"ही संकल्पना शासनाच्या "थॕंक्स अ टिचर" या उपक्रमाचा भाग आहे . कुणाचेही नामांकन,माहिती न घेता , कोविड19 लाँकडाऊन आणि अनलाँकडाऊन काळातील  शैक्षणिक व सामाजिक कार्याचे व नाविण्यपूर्ण उपक्रमाचे योगदान लक्षात घेवून "सर फाऊंडेशन " च्या वतीने  उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. त्यात या पुरस्कारासाठी गोंडपिपरी तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा, धानापूर येथे विज्ञान विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या विद्यार्थी गुणवत्तेसाठी सतत झटत असतात.  कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी त्या आजचा स्वाध्याय नावाचा उपक्रम राबवित आहे. या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर  विद्यार्थ्यासाठी करत प्रभावी अध्यापनासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
         सदर शिक्षिकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल  मान.धनराज आवारी,गटशिक्षणाधिकारी पं. स.-गोंडपिपरी यांनी अभिनंदन केले आहे तसेच तालुक्यातील सर्व आदरणीय शिक्षकांनीही विशेष अभिनंदन केले आहे.