Bhairav Diwase. Sep 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कोरोना संसर्गाची महामारी देशासह गावागावात पोहोचली आहे.याची जाणीव सर्वांना करून देताना या वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्शवादी नामदेव भाऊ सांगडे यांनी वाढदिवसाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप केले.
सोबतच वाढदिवस साजरा करताना महामारी वर उपाय योजना म्हणून मास्क ची आवश्यकता काय आहे.याची जाणीव सुध्दा प्रत्येकाना करून दिली.
योग्य रित्या वाढदिवस व मास्क वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
उपस्थित श्री.रामकृष्ण सांगडे ग्रा.पं. सदस्य धाबा, श्री. संतोष बंडावार अध्यक्ष गोंडपिपरी तालुका युवक काँग्रेस कमेटी, श्री.सुदर्शन दयालवार अध्यक्ष धाबा ग्राम काँग्रेस कमेटी, श्री.प्रदिप खारकर सचिव धाबा ग्राम काँग्रेस कमेटी, सौ.शालिनी रामकृष्ण सांगडे ग्रा.पं. सदस्या धाबा व गावातील प्रतिष्ठीत नागरिक श्री. संतोष मुपीडवार, महिला व पुरुष लोकांना मास्क वाटप केले.