Click Here...👇👇👇

आज रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 290 कोरोना बाधित.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5858 बाधित.

गेल्या 24 तासातील हे पाच मृत्यु
 Bhairav Diwase.    Sep 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 5858 झाली आहे. गेल्या 24 तासात 290 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 3261 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2526 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 3261 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

  ( गेल्या 24 तासातील हे पाच मृत्यु आहेत ) 


ज्यामध्ये शिवाजी नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष, बामनवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला, नगीनाबाग मधील 37 वर्षीय पुरुष, वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू बिकली नागभीड येथील 53 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. 

आता पर्यन्त एकूण मृत्यु 71 ( चंद्रपूर 64 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात......
 
1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे.

2) पुरेसे गरम पाणी प्या.

3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या.

4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा.

5) पुरेशी झोप आणि आराम करा.

6) योगासन करा

7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा.

8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा.

9) सकाळी आणि संध्याकाळी चाला.

10) सहज पचले असा आहार घ्या.

11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा.