श्री.अनिल डोंगरे (राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कृत महाराष्ट्र शासन,माजी उपसरपंच). Bhairav Diwase. Sep 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील सरपंच पदाचे कार्यकाळ संपलेल्या हजारो ग्रामपंचायतीत सरकारी अधिकारी म्हणून त्या त्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणुन पदभार देऊन अशा महामारीच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या त्या त्या गावाला महाराष्ट्र सरकार ने वाऱ्यांवर सोडले असुन अशा गावचा कोनी वाली उरला नाही. नुकतेच चंद्रपुर पासुन जवळच असलेल्या विचोडा ग्रामपंचायत अंतर्गत गावात कोविड पेशंटच्या संपर्कात आलेल्या परिवारचे नातेवाईकानी गावकऱ्यांना एकत्रित करुन प्राथमिक उपचार केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट चा विरोध करण्यात आला व कोविड सेंटरची गाडी वापस करण्यात आली.
तेव्हा या कर्मचाऱ्यांनी त्या गावचे *सरपंच सौ.किरण अनिल डोंगरे* याना पाचारण करण्यात आले त्यावेळी त्यांचे सोबत त्यांचे पती *श्री. अनिल डोंगरे* (राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कृत महाराष्ट्र शासन व माजी उपसरपंच) उपस्थीत होते. त्यानी गावातील प्रमुख लोक आणि पेशंटच्या परिवारातील नातेवाईक या लोकांना कोरोना महामारी या रोगाबद्दल जो गैरसमज झाला होता तो गैरसमज त्यांनी दुर करण्याचा प्रयत्न केला. परंतू हा विषय महाराष्ट्रातील एकट्या विचोडा गावापुरता मर्यादित नसून असे विषय महाराष्ट्रात बऱ्यांचशा गावात येणार असुन या कोरोना महामारीच्या काळात मुदत संपलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचा कार्यकाळ वाढवून दिला असता तर कोरोना महामारीमुळे भविष्यात येणाऱ्यां संकटाला समोरे जाण्याकरीता सरपंच प्रतिनिधी हा त्या गावासाठी देवदूत ठरला असता.

आज संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना हा महारोग भयंकर रुद्ररुप धारण करत असुन लोकांमध्ये भितिचे तसेच संभ्रमाचे वातावरण पसरले असुन अशा काळात महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा फेरविचार करुन जनमतातुन निवडुन आलेल्या या संकट मोचक सरपंच प्रतिनिधीचा कार्यकाल वाढवून दिला तर प्रशासनाला मदत होऊन अशा संकटाच्या काळात सरपंच प्रतिनिधी हा त्या त्या गावचा धागादुवा म्हणून परत मिळेल.