Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्हात आज 292 पॉझिटिव्ह, 5 मृत्यू.

Bhairav Diwase
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 7816
Bhairav Diwase.    Sep 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 7816 झाली आहे. गेल्या 24 तासात 292 नवीन बाधित पुढे आले आहेत. तर 5 बाधियांचा मृत्यू झाला आहे.


जिल्ह्यात आत्तापर्यंत 4484 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.सध्या जिल्ह्यामध्ये 3218 बाधित उपचार घेत आहे.


आतापर्यंत 4484 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील 107 सह एकूण 114 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.