Bhairav Diwase. Sep 05, 2020
पोंभुर्णा:- संपूर्ण देश कोरोना महामारीच्या काळात असतांना मदतकार्यात नेहमी अग्रेसर असलेले लोकनेते माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मौजा उमरी पोतदार येथे सानिटाईजर मशीन देण्यात आले. सध्या कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशावेळी खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकानी स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
सॅनिटायझेशन हा त्यातील महत्वाचा भाग असल्यामुळे आमदार निधीतुन ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
सॅनिटायझेशन हा त्यातील महत्वाचा भाग असल्यामुळे आमदार निधीतुन ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
श्री. सुनीलजी उरकुडे सभापती कृषी व पशु जिल्हा परिषद चंद्रपूर श्री. राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत मौजा उमरी पोतदार येथे सानिटाईजर मशीन चे लोकार्पण. यावेळी उपस्थित सौ.वनिता सिडाम सरपंच ग्रा.प. उमरी पोतदार, श्री. मनोज मुलकलवार, उपसरपंच ग्रा.प. उमरी पोतदार श्री. प्रविण चीचघरे श्री. बिपटे साहेब इ.उपस्थित होते सानिटाईजर मशीन चा वापर सतत करावा असे आव्हान करण्यात आले.