जि प उच्च प्राथ. शाळा भंगाराम तळोधी येथे शिक्षक दिन संपन्न.

Bhairav Diwase
बीट भंगाराम तळोधीचे नामदेव राऊत (शिक्षण विस्तार अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- सध्या कोरोनाचे सावट असल्याने शिक्षक दिन विद्यार्थ्यांविना साजरा करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे. शिक्षक हा भावी पीढिचा उद्गाता म्हणून बघितले जाते.देशाची खरी प्रगती शिक्षकांवर अवलंबून आहे यासाठी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून १९६२ पासून आजतागायत सुरु आहे.राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य केलेल्या डॉ. राधकृष्णन यांनी बोलून दाखविले की,"शिक्षकांचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे".याकरिता दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिक्षक दिन कोरोनाच्या सावटात सापडलेला आहे.तरी संपूर्ण भारत देशात सोशल मिडियाच्या माध्यमातून,प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन साजरा करण्यात आलेला आहे.
       आज दिनांक ५ सप्टेबर २०२० ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भंगाराम तळोधी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. बिट भंगाराम तळोधीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.नामदेव राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाला.शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील शिक्षक श्री राजेश्वर अम्मावार ,श्री दुशांत निमकर व तानाजी अल्लीवार उपस्थित होते.