जिवती तालुक्यातील प्रहार सेवक जिवन तोगरे यांनी शेतकऱ्यांना केली जानीव पुर्व मदत.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती येथील पुरुष कुटुंबाला नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून पिक कर्जासाठी बॅंकेच्या चकरा मारीत असताना. जिवती येथील प्रहार सेवक जिवन भाऊ तोगरे यांच्या संपर्कात आले. त्या महिलानी त्याना आपली व्यथा सांगितली व आता मरा शिवाय काही पर्याय नाही असे बोलले. व त्यांच्या पाणावलेले डोळे हृदयातील दुःख सांगण्याला पुरेशे होते. जिवन तोगरे यांनी संपुर्ण कागदपत्रांची पूर्तता केली व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु नेहमी प्रमाणे अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली हा सर्व प्रकार माझ्या जवळ सांगीतल्यावर प्रहार सेवक सुरज भाऊ ठाकरे यांनी बॅक अधिकाऱ्यांना फोन करून या शेतकऱ्यांना कर्जा द्यावेच लागेल अशी विनंती केली. व त्या विनंतीला मान देऊन त्या शेतकऱ्यांना कर्ज दिले. त्याचा दोन वर्षांपासूनचा वनवास संपुष्टात आला व संपुर्ण शेतकरी परीवार आज आनंदाचा श्र्वास घेतला व प्रहार सेवक जिवन भाऊ तोगरे व प्रहार सेवक सुरज भाऊ ठाकरे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.