शेकडो लोकांनी शोधल्यावर बालकाचा मिळाला मृतदेह.
सावली तालुक्यातील कापसी येथील धक्कादायक घटना.
Bhairav Diwase. Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला बिबट । वाघानी ने उचलून नेल्याने त्याचा शोधार्थ शेकडोजण जंगलात गेले आणि शोधकार्य केले असता त्या बालकाचा मृतदेह च मिळाल्याने एकच हंबरडा फोडला जात आहे . सावली तालुक्यातील कापसी येथे आज पहाटे 5 च्या दरम्यान फिरायला गेलेले काही बालक व युवक हे रस्त्यावर व्यायाम करीत असतांनाच संस्कार सतीश बुरले वय । 0 वर्ष याला बिबट / वाघाने उचलून नेल्याची चर्चा सुरू होती त्या बालकाच्या शोधार्थ गावातील शेकडो जण जंगलात गेले असून शोध कार्य घेत असतांनाच त्या बालकाचा प्यांट हा मिळाला व पुन्हा समोर शोधकार्य घेतले असता त्या बालकाचा मृतदेह मिळाला आहे. या प्रकारणची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आलेली आहे. बिबट की वाघ ने नेले हे अजून पर्यंत कळले नसले तरी या परिसरात मोठ्या प्रमानात बिबट व वाघाचा वावर आहे. कापसी परीसरात भितिंचे वातावरण पसले असुन त्वरीत वाघाचे बदोबस्त करण्यात यावी अशी मागणी कापसी वासियांनी केली आहे.