Top News

केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य श्री राहुल संतोषवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथे केशर युक्त दुध बॉटल व बिस्केट देऊन सेवा दिवस साजरा.

सेवा सप्ताहाचा पहिला, दुसरा दिवस वृद्धांना चालण्याकरिता वाकिंग स्टिकच वाटप.

पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह साजरा.
Bhairav Diwase.    Sep 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विश्वात भारताची शान उंचविणारे, कणखर नेतृत्व, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, गोरगरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदीजी यांचा वाढदिवस सर्वत्र सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.
    सेवा सप्ताहाचा पहिला दिवस केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे सन्माणानिय सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी आष्टा,चेक आष्टा,डोंगरहळदी तुकुम, सातारा तुकुम, सातारा भोसले, बोर्डा दीक्षित, गंगापूर नविन येथे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्ध व्यक्तींना चालण्याकरिता वाकिंग स्टिक काळी देण्यात आली. जगभरात  कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणुन मास्क देण्यात आले.सेवा सप्ताहाच्या दुसऱ्या  दिवशी काही गरजू वृद्धांना वाकिंग स्टिक काळी देण्यात आली.सेवा सप्ताहाच्या  तिसरा दिवस श्री. राहुल संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे कार्यकर्ते श्री. अनुपजी श्रीकोंडावार यांच्या तर्फे पोंभुरणा येथील वृद्ध व्यक्ती, महिला,पुरूष, लहान मुले हे रोज सकाळी कोरोना च्या काळात आरोग्य सुदृढ राहावे याकरिता योग, प्राणायाम, व्यायाम करतात त्यांना  केशर युक्त दूध बॉटल व बिस्केट  देण्यात येऊन सेवा सप्ताहाच तिसरा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने